इमानला चांगले उपचार मिळालेले नाहीत - शायमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - सर्वांत लठ्ठ महिला असलेली इजिप्तमधील इमान हिची बहीण शायमा हिने माध्यमांसमोर डॉक्‍टर इमानला उपचार न देता परत पाठवत असल्याचा आरोप करीत इमानला परत इजिप्तला न्यायची तयारी दाखवली; मात्र तसे करण्यासाठी डॉक्‍टरांनी आधी तशी माहिती द्यावी आणि तो अधिकार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट सांगितले.

मुंबई - सर्वांत लठ्ठ महिला असलेली इजिप्तमधील इमान हिची बहीण शायमा हिने माध्यमांसमोर डॉक्‍टर इमानला उपचार न देता परत पाठवत असल्याचा आरोप करीत इमानला परत इजिप्तला न्यायची तयारी दाखवली; मात्र तसे करण्यासाठी डॉक्‍टरांनी आधी तशी माहिती द्यावी आणि तो अधिकार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट सांगितले.

इमानला उपचार देण्यासाठी इतर डॉक्‍टरांच्याही "ऑफर्स' असल्याचे शायमाने माध्यमांशी बोलताना सांगितले. इमानला भारतात आणताना तिच्यावर उपचारांसाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. आता मात्र ते इमानला उपचार द्यायला तयार नाहीत. तिचे वजन काही महिन्यांत 300 किलो कमी झाल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्ष तसे झालेले नाही. कमी वेळात 300 किलो वजन घटले असते, तर तिचा मृत्यू झाला असता. उपचार करणाऱ्या डॉक्‍टरने तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर वर्षभरात तिचे वजन 50 ते 60 किलोने कमी होईल, असे सांगितले आहे. आतापर्यंत इमानचे 40 किलो वजन कमी झाले असेल, असा आरोप शायमाने केला आहे. आणखी काही महिने ठेवून तिचे वजन कमी करण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी इमान पायावर चालू शकेल, असेही सांगितले होते. आता एक आठवड्याच्या फिजिओथेरपीनंतर डॉक्‍टर इमान चालू शकणार नाहीत, असे सांगत असल्याचेही शायनाने माध्यमांशी बोलताना सांगितले.

इमानला इथे दररोज तपासत नाहीत. कधी डॉक्‍टर येतात कधी तर कधी अजिबात येत नाहीत. इजिप्तमध्ये तिला हलवेन; पण तशा सुविधा नाहीत. तीच परिस्थिती येथे आहे. तिच्या सिटीस्कॅनसाठी तितकी सक्षम मशीन नाही, असे शायना सांगते. इमानसाठी किती रुपये जमा झाले. तिच्या उपचारावर किती रुपये खर्च झाले, याबाबत काहीच माहिती नसल्याचे शायमाचे म्हणणे आहे. इजिप्तच्या डॉक्‍टरसह तीन इतर डॉक्‍टर इमानवर उपचार करण्यासाठी संपर्कात असल्याची माहिती शायमाने दिली.

इमानच्या मेंदूला दुखापत
इमानला येणाऱ्या आकडीचे कारण स्पष्ट झालेले आहे. "सिटी स्कॅन'नंतर हे कारण समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या सिटी स्कॅनमध्ये इमानच्या मेंदूला आघात किंवा संसर्ग झाल्याने तिला आकडी येत असल्याचे कळते.

Web Title: do not good treatment to iman