वाढत्या तापमानात आरोग्याकडे दुर्लक्ष नको!

वाढत्या तापमानात आरोग्याकडे दुर्लक्ष नको!

मुंबई - अपुरा पाऊस, त्यानंतर कडाक्‍याची थंडी आणि आता उन्हाचा वाढता ताप अशा हवामानाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत सोमवारी पारा चक्क ४० अंशांवर गेला. पुढील काही दिवस तापमान असेच वाढत राहणार असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

कडाक्याच्या उन्हात भोवळ येणे, स्नायू अशक्त होणे, ताप येणे, गॅस्ट्रो, गोवर-कांजण्या आदी साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता असते. उन्हाळ्यात रस्त्यावरील बर्फाची विक्री वाढते. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या तपासणीत अशा बर्फात ई-कोलायसारखा घातक विषाणू आढळला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बर्फ कारखान्यांच्या मालकांची बैठक घेऊन महापालिकेकडून पुरवले जाणारेच पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्य पद्धतीने न हाताळला जाणारा बर्फ नष्ट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर  यांनी सांगितले. 

सोडामििश्रत शीतपेये, रस्त्यावरील सरबत, कृत्रिम रसायने असलेले फळांचे रस, उघड्यावर कापून ठेवलेली फळे आदींपासून कटाक्षाने दूर राहावे, असे डॉक्‍टरांनी बजावले आहे.

भरदुपारी घरातून बाहेर पडणे शक्‍यतो टाळा. घराबाहेर पडण्याची गरज असल्यास डोके स्कार्फ किंवा टोपीने झाकावे. उन्हाच्या दिवसांत डायरिया, ताप आणि डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होते. नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- डॉ. बेहराम पार्डीवाला, औषध विभाग, वोक्‍हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल

हे करा... 
  तहान नसली तरी भरपूर 
पाणी प्या 
  घरी बनवलेले ताक आणि लस्सी यांचा आहारात समावेश करा 
  सौम्य रंगाचे व सैलसर कपडे परिधान करा
  उन्हापासून बचावासाठी टोपी अथवा छत्रीचा वापर करा 
  पित्ताचा त्रास असलेल्यांनी द्राक्षे खाणे टाळा 
  अशक्तपणा असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या 
  आहारात कलिंगड, टरबूज, शहाळे अादी रसाळ फळांचा समावेश करा 

हे टाळा... 
  फळांचे पॅकबंद रस पिणे टाळा
  सोडामििश्रत शीतपेये, रस्त्यावरील सरबत, कृत्रिम रसायने असलेले फळांचे रस, उघड्यावर कापून ठेवलेली फळे टाळा
  दुपारच्या उन्हात फिरणे टाळा
  उन्हातून थेट वातानुकूलित खोलीतबसू नका 
  जास्त प्रथिनेयुक्त आहार टाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com