युद्धांची पुनरावृत्ती नको - दलाई लामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - जगात 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पहिले, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, इराण, इराक, कोरिया, चीन या देशांच्या युद्धांत मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वत्र अशांतता पसरली होती. 21 व्या शतकात नागरिक शांततेचा पुरस्कार करत आहेत. 20 व्या शतकातील युद्धांची या शतकात पुनरावृत्ती होऊ नये, असे मत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टचे उद्‌घाटन दलाई लामा यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. 20 व्या आणि 21 व्या शतकातील पिढीमध्ये फार मोठा फरक आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगावर युद्ध लादण्यात आले होते. त्यात 200 दशलक्षहून अधिक नागरिक मारले गेले. त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी प्रत्येकाला आंतरिक शांततेची गरज असल्याचे ते म्हणाले.

जगात शांतता ठेवायची असल्यास मानसिक शांततेची गरजही आहे. चित्त एकाग्र असल्यास मानसिक शांतता मिळते. त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षित व अशिक्षित व्यक्तींमध्ये भावना असतात; पण शिक्षित व्यक्तींना भावनांवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Do not repeat the wars Dalai Lama