'राजकारण उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नका'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई - राजकारणात येण्यापूर्वी शिक्षणाचा पाया भक्‍कम असायला हवा. राजकारणाकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नका, असा सल्ला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी ‘यिन’च्या प्रतिनिधींशी संवाद साधताना दिला. राजकारणाचे शिक्षणातील महत्त्व या विषयावर त्यांनी यिन जिल्हा प्रतिनिधी कार्यशाळेत प्रतिनिधींच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

नेतृत्वगुणाची क्षमता असेल तर राजकारणात यायला हरकत नाही; पण केवळ तेच न करता शिक्षणाला प्राधान्य द्या. शिक्षणामुळेच तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेला वेगळे बळ मिळते. कुटुंबाची जबाबदारी आणि उपजीविकेचे साधन हाताशी असल्यानंतरच राजकारणाची पायरी चढावी, असे सांगताना वंजारी यांनी विद्यार्थिदशेतल्या काही आठवणी सांगितल्या. शिक्षणात आरक्षण असावे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, की शेकडो वर्षे वंचित असलेल्या समाजाला आरक्षण देण्याची आवश्‍यकता आहेच. हा वर्ग अजूनही बरोबरीने यायला वेळ लागेल. वंचित घटकांना सामावून घेताना दुर्बल आर्थिक घटकांना प्राधान्य दिले, तर अधिक जणांना सामावून घेता येईल, असे मत त्यांनी मांडले.
शिक्षणात काही प्रमाणात बदल होण्याची आवश्‍यकता त्यांनी व्यक्‍त केली. शिक्षण व्यवस्थेतून चांगले नागरिक तयार झाले पाहिजेत आणि चांगल्या चारित्र्याचे विद्यार्थी निर्माण झाले तर गुन्हेगारीकरण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

Web Title: Do not see politics as a means of livelihood