दिवाळीसाठी गावी निघालात ? तर हे नक्की वाचा

दिवाळीसाठी गावी निघालात ? तर हे नक्की वाचा

मुंबई : ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट भाडे घेण्याचा अधिकार खासगी  वाहतूकदारांना आहे; परंतु खासगी वाहतूकदार दुप्पट अथवा त्याहून अधिक भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत. 

विधानसभा निवडणूक संपताच नागरिकांनी दिवाळीला गावी जाण्यासाठी लगबग सुरू केली आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नागपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे रेल्वे, एसटी, खासगी वाहने अपुरी पडत आहेत. 

खासगी वाहतूकदार पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांकडून दुपटीपेक्षा अधिक भाडे घेत आहेत. मुंबई ते कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी या  मार्गांवरील खासगी प्रवासी वाहतुकीचे दर दुप्पट झाले आहेत. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन हे वाहतूकदार मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करत आहेत. 

ऑनलाईन तक्रारीची सुविधा 

प्रवाशांनी जादा भाडे घेणाऱ्या वाहतूकदारांची तक्रार parivahan.gov.in, transport.maharashtra.gov.in या पोर्टलवर; तसेच टपाल, ई-मेलद्वारे तक्रार करावी. प्रवाशांनी तक्रारीत तिकिटाचे छायाचित्र, वाहन क्रमांक, प्रवासाचा मार्ग व अन्य माहिती लिहून राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात तक्रार पाठवावी. त्यानंतर संबंधित खासगी वाहतूकदारावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले. 

web title : do read bus fares for diwali vacation


 

भाडेवसुलीच्या तक्रारी आल्यास संबंधित वाहतूकदारांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी वायुवेग पथके नेमण्यात आली असून, राज्यातील सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत. 
- अभय देशपांडे, प्रवक्ता, प्रादेशिक परिवहन विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com