तुम्ही "हॉक्‍सबिल कासव" पाहिलंय का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

वर्सोवा किनाऱ्यावर हॉक्‍सबिल प्रजातीचे दुर्मीळ कासव आढळले

मुंबई: वर्सोवा किनाऱ्यावर हॉक्‍सबिल प्रजातीचे दुर्मीळ कासव आढळले. अरबी समुद्रात दिसणारे हे कासव किनारपट्टीवर अभावानेच येते, अशी माहिती कांदळवन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी दिली. या प्रजातीमधील कासव दोन वर्षांपूर्वी वांद्रे किनाऱ्यावर आढळले होते. 

कादंळवन विभागाच्या सहकार्याने या कासवाला तातडीने डहाणू येथील कासव संवर्धन केंद्रात पोहोचवण्यात आले. तपासणी केली असता या कासवाला जखमा आढळल्या नाहीत. अशक्तपणामुळे हे कासव किनाऱ्यावर आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know about hawksbill tortoise? varsova beach