"जे.जे.'तील डॉक्‍टरांचे आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक, अलार्म बसवण्याचे आश्‍वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर मंगळवारी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले. शनिवारपासून हे आंदोलन सुरू होते.

महाजन यांनी मंगळवारी निवासी डॉक्‍टरांची संघटना असलेल्या "मार्ड'च्या शिष्टमंडळाशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. डॉक्‍टरांच्या मागणीनुसार रुग्णालयात 28 ठिकाणी तत्काळ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असून, दीड महिन्यात अलार्म बसवण्यात येणार आहेत. या अलार्ममुळे आपात्कालीन वेळेस सुरक्षा यंत्रणेला सतर्क करणे सोपे होईल, असे महाजन म्हणाले. तर डॉक्‍टरांची सुरक्षा हीच आमची मुख्य मागणी होती. आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून, अन्य मुद्द्यांवरही सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे "मार्ड'चे सचिव डॉ. आकाश माने यांनी सांगितले.

जे. जे. रुग्णालयात शनिवारी रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन डॉक्‍टरांना मारहाण केली होती. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांनी हे आंदोलन सुरू केले होते.

Web Title: doctor agitation stop