मोबाईलचोरांमुळे डॉक्‍टरने गमावला पाय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

वडाळा - हार्बर मार्गावरून लोकलने प्रवास करताना मोबाईल चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात एका होमिओपॅथिक डॉक्‍टरला पाय गमवावा लागला. याप्रकरणी मोबाईलचोरीचा गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या दोन सराईत चोरांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मोबीन मोईन खान आणि मोहम्मद फरान मोहम्मद नसीम खान अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती लोहमार्ग वडाळा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली. 

डॉ. मेहबूब अली खान ट्रॉम्बे चिता कॅम्प परिसरात राहतात. 29 मार्च रोजी ते मानखुर्द ते सॅण्डहर्स्ट रोड असा रेल्वेने प्रवास करीत होते. लोकल दुपारी अडीच वाजता रे रोड स्थानकावर येताच एका तरुणाने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून दुसऱ्याकडे देत धूम ठोकली. खान यांनी दोघांचा पाठलाग सुरू केला; परंतु लोकलची धडक लागून त्यांना पाय गमवावा लागला. वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मोहम्मद मोबीनला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देताना त्याला त्याच्या साथीदारासोबत अटक केली. 

Web Title: Doctor has lost legs due to mobile thieves