वैद्यकीय प्रशिक्षणार्थींचा आजपासून संप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - विद्यावेतनात वाढ केली जावी, या मागणीसाठी राज्यातील अठरा वैद्यकीय महाविद्यालयांतील दोन हजार तीनशे प्रशिक्षणार्थी बुधवारपासून (ता. 13) बेमुदत संप पुकारणार आहेत. या संपाला "मार्ड' आणि "इंडियन मेडिकल असोसिएशन'ने पाठिंबा दिला आहे. विद्यावेतनात वाढ करण्याचे आश्‍वासन 2014मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिले होते; मात्र या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रशिक्षणार्थींना सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. ते 11 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्‍वासन चार वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. अद्याप त्याची पूर्तता होत नाही, अशी टीका "असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'चे अध्यक्ष दर्शन कलाल यांनी केली. या प्रशिक्षणार्थींनी दोन महिन्यांपूर्वीही एक दिवसाचे आंदोलन केले होते.
Web Title: doctor medical trainee strike