बलात्कार करून डॉक्‍टरची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - विलेपार्ले येथील डॉ. श्रद्धा काशिनाथ पांचाळ (वय 25) यांच्यावर सोमवारी (ता. 5) रात्री त्यांच्या घरात बलात्कार करून हत्या करण्यात आली.
डॉ. श्रद्धा कुटुंबीयांसह विलेपार्ले-पूर्व येथील लीलाबाई चाळीत राहत होत्या.

तळमजल्यावर त्यांचे आई-वडील व बहीण राहतात, तर पहिल्या मजल्यावर त्यांची खोली आहे. दादर येथील खासगी कंपनीत ऑक्‍युपेशनल व फिजिओथेरपिस्ट म्हणून त्या नोकरी करत होत्या. त्या सोमवारी रात्री 11 वाजता मैत्रिणींना भेटून घरी आल्या. घरच्यांशी गप्पा मारून आपल्या खोलीत गेल्या. आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या खोलीतून धूर येत असल्याचे एका रहिवाशाने पाहिले. त्यांच्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून लावण्यात आली होती. ती उघडल्यावर डॉ. पांचाळ विवस्त्रावस्थेत पडल्याचे त्याला आढळले. रहिवाशांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. डॉ. पांचाळ यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे आणि त्यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

Web Title: doctor rape & murder