महिलेच्या पोटातून साडेचार किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कळवा - वांगणी ता कर्जत येथील एका 63 वर्षीय गरीब आदिवासी महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून गर्भाशयातील साडेचार किलो वजनाची गाठ काढण्यात ठाणे महापालिकेतील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज  रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले असून, या महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

अनेक रुग्णालयात उपचारासाठी फिरून आल्यावर पोटातील वेदना कमी होत नसल्याने वांगणी येथील काळूबाई (63)या आदिवासी मोल मजुरी करणाऱ्या महिला ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दि 25 नोव्हेंबरला दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सिटीस्कॅन केल्यावर 14.5 सेंमी आकाराची गाठ तिच्या गर्भाशयमध्ये असल्याचे सांगितले. तिची रक्तातील तपासणी केल्यावर तिचा रक्तदाब व रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्याचे जाणवले त्यावर डाँक्टरानी तिच्यावर उपचार करून नुकताच दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या डीन डॉ. संध्या खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनीता उबाळे यांनी आणि त्यांच्या पथकाने तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केलब. तिच्या गर्भाशयातून सुमारे साडेचार किलो वजनाची गाठ(ट्युमर)काढण्यात डाँक्टराना यश आले आहे.

सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Doctor success in removing four and a half kilos tumer from the womb's