ठाण्यात डॉक्‍टरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

ठाणे - ठाण्यातील येऊर येथील नशामुक्ती केंद्रात रविवारी (ता. 15) नितीन शिवळेकर (वय 59) या डॉक्‍टरने हाताची नस कात्रीने कापून आत्महत्या केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पवईमध्ये राहणारे डॉ. शिवळेकर नशेच्या गोळ्या घेत असत. हे व्यसन सोडण्यासाठी त्यांच्यावर येऊर येथील नशामुक्ती केंद्रात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी हाताची नस कात्रीने कापली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: doctor suicide