केईएम रुग्णालयात डॉक्‍टरची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मुंबई : परळमधील केईएम रुग्णालयातील डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (वय 27, मूळ रा. अमरावती) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 16) हा प्रकार उघडकीस आला. प्रेमप्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

मुंबई : परळमधील केईएम रुग्णालयातील डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (वय 27, मूळ रा. अमरावती) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 16) हा प्रकार उघडकीस आला. प्रेमप्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

केईएम रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या निवासी डॉक्‍टरांच्या वसतिगृहाच्या गच्चीवर डॉ. जयस्वाल यांचा मृतदेह आढळला. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मूळचे अमरावतीचे असलेले डॉ. प्रणय हे डॉ. समर्थ पटेल यांच्यासोबत तीन वर्षांपासून केईएमच्या वसतिगृहात राहत होते. डॉ. प्रणय हे वरिष्ठ निवासी जनरल सर्जन असून त्यांचे एमएसचे शेवटचे वर्ष पूर्ण झाले आहे. ते घरगुती कारणावरून 5 ते 6 महिन्यांपासून नैराश्‍यात होते. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून त्यांचा फोन बंद असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या मित्रांनी शोधाशोध केली; पण त्यांचा थांग लागला नव्हता. 
अखेर डॉ. प्रणय बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर

पोलिसांनी शोध घेतला असता शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास वसतिगृहाच्या गच्चीवर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक इंजेक्‍शनही सापडले. 
डॉ. प्रणय यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रेमसंबंधातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अमरावतीत महाविद्यालयात शिकताना एका मुलीवर त्यांचे प्रेम होते; पण त्यांच्यातील वादामुळे ते नैराश्‍यात होते, अशी माहिती समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor suicide at KEM hospital