बलात्कारप्रकरणी डॉक्‍टर अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या डॉक्‍टरला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 13) पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणी वांद्रे येथील एका दाताच्या दवाखान्यात सहायक म्हणून काम करू लागली. या दवाखान्यात प्रॅक्‍टिस करणाऱ्या एका डॉक्‍टरसोबत तिची ओळख झाली. त्यांच्यातील मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. लग्नाच्या भूलथापा देऊन डॉक्‍टरने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर डॉक्‍टरचे आधीच लग्न झाल्याचे तरुणीला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

Web Title: doctor was arrested in the rape case