अरे वाह ! लॉकडाउनमध्येही वृद्ध व्यक्तीवर झाली हिप शस्त्रक्रिया..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

मुलुंड येथील राजाराम आपटे (80) हे गृहस्थ परिसरातील केमिस्टकडे औषध खरेदीला गेले असता पडले. त्यांच्या कमरेला फ्रॅक्चर झाल्याने पादचाऱ्यांनी त्याला रिक्षात बसवले. मात्र, कंबरेतील फ्रॅक्चर एवढे गंभीर होते की, कोव्हिडच्या काळात कुठे जायचे हाच मनात विचार होता.

मुंबई: मुलुंड येथील राजाराम आपटे (80) हे गृहस्थ परिसरातील केमिस्टकडे औषध खरेदीला गेले असता पडले. त्यांच्या कमरेला फ्रॅक्चर झाल्याने पादचाऱ्यांनी त्याला रिक्षात बसवले. मात्र, कंबरेतील फ्रॅक्चर एवढे गंभीर होते की, कोव्हिडच्या काळात कुठे जायचे हाच मनात विचार होता. मात्र, नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर शस्त्रक्रियेनंतर ते चालू फिरु लागले. 

हेही वाचा: मुंबईत 'या' भागातल्या तब्बल ११ इमारतींमध्ये होणार क्वारंटाईन सेंटर?महापालिकेचा उच्च न्यायालयात अर्ज

आपटे यांनी दुकानातून औषधं विकत घेतली आणि पायऱ्या चढताना अचानक पडले. त्यामुळे, त्यांना प्रचंड वेदना झाल्या. सुदैवाने काही वाटसरूंनी त्यांना ऑटोरिक्षात बसण्यास मदत केली आणि घरी सोडले. त्यांच्या पत्नीने आणि शेजाऱ्यांनी स्थानिक नर्सिंग हॉस्पिटलमध्ये आपटेंना दाखल केले. लॉकडाऊन असल्याने त्यांचा पुण्यातील मुलगा आणि विलेपार्ले येथील मुलगी त्यांना पहायला लवकर येऊ शकले नाही. 

आपटे यांच्यावर तत्काळ सर्जरी करण्याची गरज होती. त्यांच्या मुलीने विले पार्ले येथील नानावटी हॉस्पिटलमधील सिनिअर आर्थोपेडिक सर्जन डॉ. सुनिल शहाणे यांच्याशी संपर्क साधला. अपघातामुळे त्यांच्यावर तत्काळ बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागणार होती. इतर कोणतेही आजार नसल्यामुळे धोका नव्हता. तरीही त्यांचे वय आणि सध्या सुरु असलेली कोविड-19 ची साथ हेच मोठे अडथळे असल्याचे डॉ. शहाणे म्हणाले. 

संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर आमटे यांच्यावर 3 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. रुग्ण काही दिवसातच चालू फिरु शकला. त्यांनी पूर्णपणे स्वावलंबी होण्यासाठी डीस्चार्जनंतरचे समुपदेशन केले असल्याचे डॉ. शहाणे यांनी सांगितले. आपटे आता वेेदनारहित झाल्यामुळे पुन्हा दैनंदिन व्यवहार करत आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दिनचर्या सुरू करेन, अशी प्रतिक्रिया आपटे यांनी दिली.

doctors did hype surgery of  old man 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors did hype surgery of old man