esakal | वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आज डॉक्‍टरांचे काम बंद! कायम भरती, वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आज डॉक्‍टरांचे काम बंद! कायम भरती, वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

कायम सेवेत सामावून घ्यावे व रोखठोक मानधन न देता सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्‍टरांनी सोमवारी (ता. 11) काम बंद आंदोलन पुकारले आहे

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आज डॉक्‍टरांचे काम बंद! कायम भरती, वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कायम सेवेत सामावून घ्यावे व रोखठोक मानधन न देता सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्‍टरांनी सोमवारी (ता. 11) काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात सकाळी 8 वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असून मुंबईतील जेजे रुग्णालयात सकाळी 10 वाजता आंदोलन होईल, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी संघटनेतर्फे सांगण्यात आले. 

राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील 480 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांच्या स्थायी पदांवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे रुग्णसेवा करूनदेखील डॉक्‍टरांना अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारी काम बंद आंदोलन करून नंतर आठ दिवस काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयाच्या अस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातील अपघात विभाग, प्रशासन आदी जबाबदाऱ्या पार पडतात. या अधिकाऱ्यांनी कोरोना काळातही आपली व कुटुंबाची पर्वा न करता रुग्णसेवा पार पाडली. त्यामुळे सरकारने वर्षानुवर्षे रुग्णसेवा करणाऱ्या या डॉक्‍टरांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी वैद्यकीय अधिकारी संघटनेची मागणी आहे. वर्षानुवर्षे या पदाचे काम आणि अनुभव आल्यानंतरही या पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती होत नसल्याने वैद्यकीय अधिऱ्यांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदने दिल्यानंतरही कायमस्वरूपी नियुक्‍त्या करण्यात आल्या नाहीत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. 

कोणत्याही सवलती नाही! 
शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव असूनही कायमस्वरूपी डॉक्‍टरांपेक्षा कमी वेतन दिले जाते. त्यांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते, मॅटर्निटी लिव्ह तसेच अन्य सवलती दिल्या जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 
Doctors work closed in medical colleges today Permanent recruitment, agitation for various demands including salary

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image