कुत्र्याने घेतला सात वर्षांच्या मुलीचा चावा

अजय दुधाणे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

उल्हासनगर : उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात एका सात वर्षांच्या मुलीला एका कुत्र्याने चावा घेतला असता तिचं तोंड आणि नाक फाडलय, या घटनेनंतर जखमी मुलीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मराठा सेक्शन भागात हर्षदा जालगार ही सात वर्षाची मुलगी राहत आहे. ती आज सकाळी क्लासहून घरी येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कुत्र्याने चावा घेतला. या घटनेत तिचं तोंड आणि नाक कुत्र्याने अक्षरशः फाडलं. या घटनेनंतर जखमी मुलीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. तिला मोठी जखम झाल्याने हर्षदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हर्षदाची आई शालिनी जालगार यांनी दिली. 

दरम्यान, उल्हासनगर महानगरपालिका कुत्र्याबद्दल नसबंदीच्या उपाययोजना करत नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात रात्रीच्या सुमारास चौकाचौकात कुत्र्यांची झुंड दिसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रात्रीच्या सुमारास शहरात फिरणे अवघड झाले आहे, अशी परिस्थिती सध्या परिसरात उपस्थित उद्भवली आहे.

Web Title: Dog Beaten to seven years old girl in Ulhasnagar