उल्हासनगरात भटक्या कुत्रीने तोडले मुलांचे लचके

दिनेश गोगी
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

उल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. विदर्भ मलकापूर येथील लहान मुलगीही कुत्रीच्या लचक्याची शिकार झाली. पालिकेच्या श्वान पथकाने कुत्रीला पकडून नेले आहे.

मानसी दोडे (वय.14), दक्ष रोकडे (वय.5) कुणाल चव्हाण (5), दीपक झा (12), विवेक पालिवार (12), रोशनी गवई (7), अरुशी यादव (9) या सात लहान मुलांचे भटक्या कुत्रीने लचके तोडले आहेत. रोशनी गवई ही विदर्भातील मलकापूर येथून नातलगांकडे पाहुणी म्हणून आली आहे. कुत्रीने तिच्या तोंडावर हल्ला केल्याने व लचके तोडल्याने रोशनीला उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. बाकी मुलांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे .

दरम्यान, सम्राट अशोक नगरातील अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी भटक्या कुत्रीने लहान मुलांचे लचके तोडले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कुत्रीला उचला असा फोन केल्यावर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी श्वान पाठवून कुत्रीला पकडण्यात आले आहे. याबाबत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, 6 मुलांना रेबीजची इंजेक्शने व मलमपट्टी करून घरी सोडण्यात आले असून, रोशनी गवईच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले.

Web Title: Dog has bites Children body in Ulhasnagar