डोंबिवली : मनसे विद्यार्थी सेनेच्या विभागीय अध्यक्षावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Kot

कल्याण मोहने येथील विकासक आणि मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष अमित कोट यांच्यावर चौघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

डोंबिवली : मनसे विद्यार्थी सेनेच्या विभागीय अध्यक्षावर हल्ला

डोंबिवली - कल्याण मोहने येथील विकासक आणि मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष अमित कोट यांच्यावर चौघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. कोट हे मित्राच्या मुलीचे अडमिशन घेण्यासाठी बिर्ला कॉलेज येथे जात असताना बंदरपाडा परिसरात हा हल्ला झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अश्विन जोगदंड (वय 35), संदीप डोलारे (वय 34) यांसह दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी कोट यांना बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

मोहने आंबिवली परिसरात अमित कोट (वय 29) हे राहण्यास असून ते मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष तसेच बांधकाम व्यावसायिक आहेत. सोमवारी दुपारी ते आपला मित्र गोरख येवले यांच्या सोबत बिर्ला महाविद्यालयात गोरख यांच्या मुलीला अकरावीत प्रवेश घेण्यासाठी जात होते. बंदररोड परिसरातून जात असताना अश्विन, संदीप व त्यांच्यासह असलेल्या दोघांनी अमित यांच्या कारला आडवे येऊन त्यांची कार थांबवित त्यांच्याशी गाडीला ओव्हरटेक का केले यावरुन वाद घातला.

अमित हे कारमधून बाहेर येत त्यांना काय झाले अशी विचारणा करताच संदीप याने अमित यांचे हात पकडले व अश्विन याने अमितला शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्विन याने अमित यांच्या छातीवर चाकूने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. तू मला जिथे भेटशील तिथे मी तुला ठार मारीन अशी धमकी दिली. आजूबाजूला लोक जमा झाल्याने चौघांनी तेथून पळ काढला.

याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अमित यांच्या तक्रारीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. अमित हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. तर आरोपी अश्विन हे शिवसेनेतील शिंदे समर्थक गटातील असल्याची चर्चा आहे.

Web Title: Dombivali Attack On Mns Vidyarthi Sena Divisional President Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeattackmnsdombivali