esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : पालकांच्या परवानगीनेच मुले शाळेत

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाउन नंतर अखेर सोमवार पासून 8 वी ते 12 वी च्या शाळा (School) सुरू झाल्या. कल्याण (Kalyan) डोंबिवली (Dombivali) शाळांत मुलांचे कुठे बँड बाजाच्या आवाजात स्वागत करण्यात आले, तर कुठे टेम्परेचर घेऊन शिक्षक मुलांच्या स्वागतासाठी उभे होते.

पालकांचे संमतीपत्र मात्र अत्यावश्यक केले गेले असून ते पाहिल्याशिवाय एकाही मुलाला शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. शाळेची ती खोली...तो बाक आणि ठराविक अंतर सोडून का होईना पण बाजूला असलेले मित्रमैत्रिणीना भेटून मुले आनंदित झाल्याचे पहायला मिळाले.

सोमवारपासून राज्यात शहरी भागात आठवी ते बारवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज कल्याण डोंबिवली शहरातील शाळाही सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत प्रत्येक शाळांनी वेळेचे नियम तयार केले आहेत. काहींनी इयत्तानुसार वेळेचे नियोजन केले आहे. कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बँड बाजा वाजवून मुलांचे स्वागत केले. मुलांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून अर्ध्या तासाच्या फरकाने वर्ग भरविण्यात आल्याचे मुख्याध्यापक गुलाब पाटील यांनी सांगितले. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर शाळेत प्रथम सर्व मुलींचे वर्ग भरविण्यात आले, त्यानंतर मुलांचे वर्ग भरविण्यात आले होते. शाळेत सुमारे 75 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे मुख्याध्यापिका लीना ओक मॅथ्यू यांनी सांगितले.

हेही वाचा: भविष्यवाण्या झाल्या तरी आघाडीला धोका नाही - थोरात

कुठे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले.

पालकांचे संमतीपत्र विद्यार्थ्यांकडून घेतले जात होते. तसेच शरीराचे तापमान तपासून एका एकाला वर्गात सोडले जात होते. काही शाळांच्या गेटवर मुलांनी गर्दी केल्याचे दिसून आले. अंतर सोडून उभे रहा, पालकांनी गर्दी करू नका अशा सूचना वारंवार शिक्षकांकडून केल्या जात होत्या.

हेही वाचा: 'सोशल मीडियामुळे बाललैंगिक अत्याचारांत वाढ; पालकांनी सतर्क रहावे'

सुरवातीचे काही दिवस शिक्षक मुलांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधणार आहेत. त्यानंतर अभ्यासक्रमास सुरवात केली जाणार आहे.

प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आली असून परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन ते तीन तास विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येत आहेत.

loading image
go to top