डोंबिवली : स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन करतयं हेळसांड

आठवडा आठवडा उचलला जात नाही कचरा; आर्ट गॅलरी कोविड सेंटर मधील प्रकार
स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन करतयं हेळसांड
स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन करतयं हेळसांड Sakal

डोंबिवली : ओमिक्रॉनचा राज्यातील पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आल्याने राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कल्याण आर्ट गॅलरी मध्ये या रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली तरी स्वच्छतेच्या बाबतीत मात्र प्रशासन हेळसांड करत असल्याचे चित्र आर्ट गॅलरीत दिसून आले. रुग्णालय परिसरात जैविक वैद्यकीय कचऱ्यासह इतर कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. हा कचरा दररोज नाही तर आठवड्यातून एकदा किंवा उशिराने उचलला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

केपटाऊन येथून डोंबिवलीत परतलेल्या 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच राज्यासह स्थानिक आरोग्य विभाग सतर्क झाला असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने कामाला देखील लागला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन करतयं हेळसांड
मुंबई : मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत

एककिडे खबरदारीचे सर्व उपाय राबविण्याच्या तयारीत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला कोरोना रुग्णालयातील स्वच्छतेचा मात्र विसर पडलेला दिसतो. महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णालये, विलगिकरण केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत. केवळ कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील आर्टगॅलरी हे कोविड सेंटर सुरू आहे.एकच सेंटर सुरू असताना देखील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीच्या महत्वाचा जबाबदारीचे पालन होत नसल्याचे रुग्णालय परिसरात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत.

रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे पीपीई किट, मास्क, हात मोजे, गॉगल्स, यांसह अन्य वैद्यकीय साहित्य, रुग्णांना जेवण्यासाठी दिले जाणारे खाद्यपदार्थ, त्याचे डब्बे असा कचरा आर्ट गॅलरी येथील रुग्णालय परिसरात आढळून येत आहे. हा कचरा उचलण्याची प्रक्रिया दररोज होत नसल्याने येथे कचऱ्याचा ढीग लागल्याचे दिसते.

गेले दोन तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हा कचरा भिजला असून त्याला दुर्गंधी येत आहे. तसेच उंदीर, घुशी कचऱ्यावर फिरत असल्याने आणखी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन करतयं हेळसांड
मुंबई : कल्याण डोंबिवलीत ओमिक्रॉनचा शिरकाव

येथील जैविक वैद्यकीय कचरा व इतर कचरा उचलण्याचे काम हे खासगी कंत्राटदार यांना देण्यात आले आहे. मात्र ते कामात दिरंगाई करत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो. कचरा उचलून नेणारी घंटागाडी वेळेत येत नसल्याने हा कचरा येथे साठून असतो. कधी आठवड्याने तर कधी आठवडा उलटूनही गाडी येत नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com