Dombivali Crime : घराचा कडी कोयंडा तोडून 39 लाखाचे दागिने चोरले

कुटूंब देवदर्शनासाठी बाहेर गेले आणि चोरट्याने ही संधी साधत घराचा कडी कोयंडा तोडून तब्बल 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना डोंबिवलीत घडली.
theft
theftSakal
Summary

कुटूंब देवदर्शनासाठी बाहेर गेले आणि चोरट्याने ही संधी साधत घराचा कडी कोयंडा तोडून तब्बल 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना डोंबिवलीत घडली.

डोंबिवली - कुटूंब देवदर्शनासाठी बाहेर गेले आणि चोरट्याने ही संधी साधत घराचा कडी कोयंडा तोडून तब्बल 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. यप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दाखल तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून चोरट्यांचा तपास सुरु केला आहे. मुलांच्या परिक्षा संपल्याने अनेक नागरिक आता सुट्टीवर बाहेर जाण्याचा बेत आखतील. परंतू या कालावधीत घरातील किंमती सामानाची देखील काळजी घ्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवली पश्चिमेतील भाविक अपार्टमेंट मध्ये श्रीनिवास गुरुपोली हे आपल्या कुटूंबासोबत राहतात. 25 एप्रिलला श्रीनिवास हे कुटूंबासह वाराणसी उत्तर प्रदेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधली आणि आपला हात साफ करुन घेतला. चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटाचे कुलूप तोडून तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी श्रीनिवास हे घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याची बाब लक्षात आली.

त्यांनी तात्काळ विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. 39 लाखाचे दागिने चोरीला गेले असून पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असून अनेक कुटूंब या दिवसांत गावी जाणे अथवा फिरायला जातात. याच दरम्यान चोरटे अशा कुटूंबावर पाळत ठेवून ते बाहेर जाताच चोरी करतात. यामुळे नागरिकांनी देखील सावध रहात आपल्या घरातील किंमती वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com