Dombivali Fraud : कमी कालावधीत नफा आणि सोन्याचे आमिष; नोकरदाराची चार कोटींची फसवणूक dombivali crime fraud Lure of profit and gold cheating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Dombivali Fraud : कमी कालावधीत नफा आणि सोन्याचे आमिष; नोकरदाराची चार कोटींची फसवणूक

डोंबिवली - गुंतविलेल्या रक्कमेवर 10 टक्के परतावा देतो, वर्षात गुंतविलेले पैसे डबल करुन व सोने देतो असे आमिष दाखवित युनिक कन्सल्टन्सीचे मालक, भागीदार यांनी गेल्या दोन वर्षात प्रतिक भानुशाली या तरुणाची तब्बल 4 कोटी 60 लाखाला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक आणि भागीदार विनय वर्टी (वय 68), गीता वर्टी (वय 60), डाॅ. सी. के. नारायण (वय 60) आणि श्रीधर (वय 50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक यांना युनिक कन्सल्टन्सीच्या माध्यमातून विनय आणि गिता व त्यासह दोघा भागीदारांनी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. वर्षभरात पैसे दुप्पट करुन देतो तसेच सोने देतो असे आमिष त्यांनी प्रतिकला दाखविले.

डिसेंबर 2021 मध्ये 60 लाख 50 हजार गुंतविण्यास सांगितले. या गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा आणि वर्षभरात हे पैसे दुप्पट करुन देतो असे आश्वासन दिले. वाढीव व्याज, सोने या आमिषाने एकूण चार कोटी रुपये आरोपींनी नोकरदार प्रतिक यांना गुंतविण्यास भाग पाडले. तुम्ही गुंतविलेले पैसे शेअर बाजारात गुंतविल्याने अधिकचा परतावा कमी कालावधीत मिळेल असे त्यांनी सांगितले. झटपट पैसे कमवण्यासाठी प्रतिक यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

दोन वर्ष उलटली तरी आकर्षक परतावा नाहीच पण मूळ रक्कमही आरोपींकडून परत मिळत नसल्याने ते आपली फसवूक करत आहेत, याची खात्री झाल्याने प्रतीक भानुशाली यांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक विनय आणि गीता वर्टी व त्यांच्या दोन भागीदारांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. रामनगर पलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.