तडीपार गुंडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali Crime : तडीपार गुंडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण पश्चिमेकडील कृषी उत्पन्न बाजार ते बाजार समिती समोर पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत.

Dombivali Crime : तडीपार गुंडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली - कल्याण पश्चिमेकडील कृषी उत्पन्न बाजार ते बाजार समिती समोर पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. व्यापारी, दुकानदार आणि रहिवाशांमध्ये माजविणाऱ्या आणि पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या कुख्यात तडीपार गुंड उमेर नाविद शेख (25, रा. चौधरी मोहल्ला, दुधनाका, कल्याण-पश्चिम) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

रेकॉर्डवरील तडीपार असलेल्या उमेर शेख व जहीर शेख या दोघा गुंडांना लोकांच्या मालमत्तेस नुकसान होऊ नये यासाठी वरिष्ठांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपार असतानाही हे दोघे गुंड कल्याणात दाखल झाले.

शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिरोज अल्लाउद्दीन शेख (25, रा. तुळजापूर, जि. सोलापूर) हा ट्रक ड्रायव्हर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्हापूरहून माल घेऊन आला होता. जेवण करण्यासाठी जात असताना ड्रायव्हर फिरोज याला उमेद शेख आणि जहीर शेख या गुंडांनी रस्त्यात अडवले. मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले. मात्र त्याच वेळी गोविंदवाडी रोडवर पेट्रोलिंग करणारे हवा.

सचिन साळवी आणि प्रेम बागुल यांनी गुंड उमेर शेख याला ताब्यात घेतले. मात्र जाहीर शेख हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वपोनि नरेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फरार जहीर शेख याला शोधण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अरुण घोलप आणि त्यांच्या पथकाने हाती लागलेल्या उमेर शेख याची चौकशी सुरू केली. अखेर उमेर याने ट्रक ड्रायव्हरला लुटल्याची कबूली दिली. त्याचा साथीदार जहीर शेख याचा पोलिस कसोशीने शोध घेत आहेत.