Diva Development : दिव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानाना साकडे

ठाण्याच्या धर्तीवर दिव्यातही क्लस्टर योजना राबविण्यात येईल. दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसला जाईल.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

डोंबिवली - ठाण्याच्या धर्तीवर दिव्यातही क्लस्टर योजना राबविण्यात येईल. दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसला जाईल. आणि दिवेकरांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथील जाहीर सभेत दिवेकरांना दिले. दिवा येथील विकास कामांसाठी कोटींचा निधी मंजूर केला आहे.

आणखी 470 कोटींची मागणी करण्यात आली आहे. त्याचाही विचार करण्यात येईल. यामध्ये दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी असून त्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी घोषित केले. दिव्याच्या विकासासाठी जे करता येईल ते करण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

दिवा येथील विकास कामे, बेतवडे येथील आगरी कोळी वारकरी भवन, खिडकाळेश्वर मंदिर या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, बाळकृष्ण म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवडणूका आल्या म्हणून आम्ही आश्वासन देणार नाही. विकास कामांना गती देण्याचे काम हे सरकार करत आहे. मी नगरविकास मंत्री असताना या ठिकाणी नगरविकास तसेच अनेक योजनांच्या माध्यमातून मला निधी देता आला.

आज तुमच्यासाठी थांबलो कारण हा मुख्यमंत्री तुमच्यातलाच एक आहे. आपल्या प्रेमाच्या पुढे मी जाऊ शकत नाही. तुमच्या प्रेमाच्या पुढे निधी देखील काहीच नाही. मागणी केल्याप्रमाणे या दिव्यात अनेक कोटींचा निधी दिला. आणखी 470 कोटींची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये मुंब्रा फायर ब्रिगेड, चुहा ब्रिज, स्वतंत्र पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महारात पुतळा उभारणी साठी 4 कोटी अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्या प्रेमसमोर या रक्कमा कमी पडतील. कारण या राज्यात शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेले सरकार आले. या सरकारने घेतलेले निर्णय सर्व सामान्य लोकांना न्याय देणारे घेतले.

Eknath Shinde
Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर

मला विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात रेल्वे विभाग आहे. रेल्वे मंत्रालय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मोदी साहेबांनी विन्नती दिव्यासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जे काही विकास कामांचे प्रस्ताव गेले त्यात एक ही रुपयांची कपात न करता तसे प्रस्ताव मोदी सरकार मंजूर करतात म्हणूम राज्याचा विकास झाला आहे.

शब्द दिला...

दिव्यातील डम्पिंग हटविण्याचा शब्द दिला होता, हटवून दाखवलं. क्लस्टर योजना दिव्यात येईल, अनधिकृत इमात्तीचा शिक्का पुसण्याचा काम करेल. स्वतंत्र पोलीस ठाणे 5 कोटी रुपयांचा निधी आयुक्तांना जागा शोधण्याची निर्देश दिले आहेत.

20 - 25 वर्षाचा क्लस्टर चा संघर्ष अंतिम टप्प्यात आला आहे. ही योजना दिव्यात देखील सुरू करण्याचा निर्णय आयुक्त महोदय घ्यावा तसे त्यांना सूचित करण्यात आलं आहे.

Eknath Shinde
Mumbai News : ७३ वर्षीय आजीचे टीसीनी वाचवले प्राण!

यंदा महाराष्ट्र एक नंबर वर

2020 - 21 या देश विदेशात आर्थिक गुंतवणूक मध्ये गुजरात राज्य एक नंबर वर होते. 2021 - 22 मध्ये कर्नाटक राज्य यावर्षी 2022 - 23 मध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या नंबर वर असेल.

वारकरी भवनासाठी 30 कोटींचा निधी

आगरी कोळी वारकरी भवनचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या कामाच्या टप्प्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुढील कामाचा निधी देखील मंजूर व्हावा, त्याचे निवेदन देऊ. तो मिळाल्यास वर्षभरात हे काम पूर्ण होईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आराखडा सादर करा अतिरिक्त 15 कोटींचा निधी देण्यात येईल हे जाहीर केले.

Eknath Shinde
Mumbai Crime : रिक्षाच्या भाड्यातून वाद... अज्ञात रिक्षा चालकाकडून तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करून लूट...

अभंगातून विरोधकांवर टिका

वारकरी भवन असो किंवा दिवा येथील विकासकामे यावरून मनसे, भाजपा व ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. यावर बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, चांगला कार्यक्रम होत असताना लोक टीका करतात. दुर्बुद्धी सुचते काही लोकांना त्याच्यासाठी तुकाराम महाराज यांचा एक अभंग म्हणत उत्तर दिले. आपण आपले धेय्य समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी काम करत राहिले पाहिजे असे ते म्हणाले.

भुंकती तीं द्यावीं भुंकों ।

आपण त्यांचें नये शिकों ॥१॥

भाविकांनीं दुर्जनाचें ।

कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥

होईल तैसें बळ ।

फजीत करावे ते खळ ॥२॥

तुका म्हणे त्यांचें ।

पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक

ही वारकऱ्यांची भूमी असून कल्याण डोंबिवली मध्ये संत सावळाराम महाराज स्मारक उभारणार उभे करण्याचा मानस श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला दुजोरा देत या स्मारकासाठी जागा पण मिळेल आणि निधी देखील मिळेल असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मुलाचे केले कौतुक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फायदा तुम्हाला होतोय. कारण तो पाठपुरावा करत असतो. 2014 ला खासदार म्हणून त्याने काम सुरू केले. आपण सर्वांनी त्याला प्रेम दिले. सुरवातीला मला त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले. पण 2019 मध्ये मला त्याच्यासाठी फिरावे लागले नाही. त्याने त्याच्या कामातून त्याची ओळख निर्माण केली आहे. आपण असेच प्रेम त्याच्यावर कराल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com