डोंबिवली : फुकट दारू न दिल्याने मॅनेजरला मारहाण

जखमी हॉटेल मॅनेजरवर आर.आर. बाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Mumbai
Mumbaisakal

डोंबिवली : फुकट दारू न दिल्याने एका टोळक्याने खंबाळपाडा येथील एका हॉटेल मॅनेजरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दीपेश म्हात्रे, विनायक पाटील यांसह इतर 2 जणांविरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंबाळपाडा येथील फोर सिझन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री दीपेश म्हात्रे, विनायक पाटील हे इतर दोन जण आले होते. हॉटेल मॅनेजर नित्यानंद भंडारी यांच्याकडे त्यांनी फुकट दारूची मागणी केली. ती न दिल्याचा राग आल्याने या टोळक्याने मॅनेजर ला मारहाण करीत कॅश काउंटर चे नुकसान करीत 76 हजाराची रोख रक्कम, मॅनेजरच्या गळ्यातील 6 तोळ्यांची सोन्याची चैन यासोबतच सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील चोरून नेला आहे.

Mumbai
हॉटेल कर्मचाऱ्याची 13 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

जखमी हॉटेल मॅनेजरवर आर.आर. बाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलीस या टोळक्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com