डोंबिवली : अधिकृत गाळे तर घेतले, पण ग्राहकच नसल्याने विक्रेते नाराज

अधिकृत गाळे तर घेतले, पण ग्राहकच नसल्याने विक्रेते नाराज
Mumbai
MumbaiSakal

डोंबिवली : दिवाळीनिमित्त बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. विक्रेत्यांना या दिवसांत विक्री करता यावी म्हणून पालिका प्रशासनाने त्यांना अधिकृत गाळे उभारून दिले आहेत. मात्र बाजारात अनधिकृत फेरीवाल्यांचा बोलबाला जास्त असल्याने या दुकानात खरेदीसाठी ग्राहक फिरकत नाहीत. शुल्क भरून गाळे विकत घेतले मात्र कमाईच नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना या परिसरात महापालिकेने बसू देऊ नये अन्यथा आम्ही महापालिकेवर मोर्चा नेणार असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले.

दिवाळीची खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. दिवाळीच्या दिवसांत फटाके विक्रेत्यांना अधिकृत रित्या व्यवसाय करता यावा यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून विक्रेत्यांना प्रत्येक प्रभागात एक ठराविक जागा निश्चित करून तात्पुरते गाळे उभारून देण्यात आले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथे 36 गाळे पालिकेने बांधून दिले आहेत. मात्र येथे ग्राहक फिरकत नसून बाहेरील विक्रेत्यांकडे मात्र ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

Mumbai
त्वरीत विक्री अन् रोख पैसा यामुळे शेतकऱ्यांची तुरीला पसंती

महापालिकेकडून आम्ही हे गाळे काही शुल्क आकारून भाड्याने घेतले आहेत. याच्या लायसन्स साठी 10 ते 15 हजार रुपये खर्च होत असतात. तसेच मागीलवर्षी कोरोनामुळे काही व्यवसाय झाला नाही. आमच्याजवळ होती ती जमापुंजी टाकून यावर्षी आम्ही माल विकत घेतला आहे. मात्र जर व्यवसायच होणार नाही तर असे अधिकृत दुकान घेण्याचा फायदा काय. या मैदानाच्या बाहेर अनधिकृत 40 ते 50 दुकाने लागली आहेत. त्यांना कोणीही लायसन्स विचारायला येत नाही. मात्र पालिकेचे कर्मचारी आम्हाला लायसन्स विचारायला येतात.

Mumbai
जिमी शेरगीलला 'चूना', यामुळे थांबवलं वेबसीरिजचं शुटिंग

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली, किंवा त्यांना आमच्या परिसरात बसू दिले नाही तर आमचीही चार पैशाची कमाई होईल. पालिकेने आमचे म्हणने ऐकले नाही तर आम्ही पालिका कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील यावेळी विक्रेत्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com