Dombivali Crime : रेल्वे फाटक उघडण्यासाठी ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ; पाच जणांना अटक

रेल्वे फाटक बंद असताना देखील सात प्रवाशांनी गुरुवारी रात्री दिडच्या दरम्यान फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला.
Crime
CrimeSakal
Summary

रेल्वे फाटक बंद असताना देखील सात प्रवाशांनी गुरुवारी रात्री दिडच्या दरम्यान फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला.

डोंबिवली - दुरुस्ती कामामुळे ज्युचंद्र येथील रेल्वे फाटक बंद असताना देखील सात प्रवाशांनी गुरुवारी रात्री दिडच्या दरम्यान फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला. तसेच रेल्वे फाटक नियंत्रकाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फाटक नियंत्रक गुंजन सिंह यांच्या तक्रारीवरुन सात जणांच्या विरुध्द डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात रोहित विश्वकर्मा (वय 34), साजन सिंग (वय 28), गौरव सिंग (वय 19), संतोष यादव (वय 27), विल्सन डिसोजा (वय 27), यांसह एक अनोळखी महिला व एक पुरुष अशा सात जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गुरुवार 26 जानेवारीला रात्री एक वाजल्यापासून ज्युचंद्र ते चंद्रापाडा रेल्वे मार्गा दरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम रेल्वे तांत्रिक विभागाने हाती घेतले होते. रेल्वेचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी राज कुमार, कुणाल कुमार, नीलेश साळुंखे, दत्ता पाटील असे अनेक कर्मचारी तेथे तैनात होते. दुरुस्ती कामामुळे ज्युचंद्र येथील रेल्वे फाटक बंद होते. भिवंडी दिशेकडे एक मालगाडी दिवा स्थानकाकडे येण्यासाठी मार्गस्थ होत होती.

या कालावधीत दीड वाजता एका कारमधून सहा जण रेल्वे फाटका जवळ आले. त्यानंतर एक दुचाकी स्वार आला. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्यासाठी मोठ्याने आपल्या वाहनांचे हॉर्न वाजविले. दुरुस्तीचे काम सुरू असून भिवंडी जवळ एक मालगाडी उभी आहे. त्यामुळे फाटक उघडता येणार नाही असे नियंत्रक गुंजन सिंग यांनी सांगताच, मोटार, दुचाकीवरील वाहन चालक, प्रवासी रेल्वे मार्गात येऊन गोंधळ घालू लागले. त्यानंतर सिंगला शिवीगाळ करू लागले. फाटक उघडा असा त्यांचा आग्रह होता. रेल्वे सुरक्षा जवान उमेश कुमार प्रवाशांची समजूत घालत होते. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

प्रवासी आक्रमक झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अखेर वाढीव पोलिसांना पाचारण करण्यात आले. मालगाडी कामण स्थानकातून कोपर दिशेने निघाली असताना प्रवाशांचा फाटक उघडण्याचा गोंधळ सुरू होता. अखेर फाटक नियंत्रक सिंग यांनी आपत्कालीन परिस्थितीचा दर्शक देऊन मालगाडी थोपवून धरली. या गोंधळात चार वाजले. प्रवाशांच्या गोंधळामुळे मालगाडी दोन तास उशिरा रवाना झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल सात जणांच्या विरुध्द लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com