शाळेतील शिक्षकाचे दिवसाढवळ्या अपहरण करून लुटले

कल्याण पश्चिमेत राहणारे शिक्षक जगदीश पवार यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Jagdish Pawar
Jagdish PawarSakal
Summary

कल्याण पश्चिमेत राहणारे शिक्षक जगदीश पवार यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

डोंबिवली - कल्याण पश्चिमेत राहणारे शिक्षक जगदीश पवार यांचे दिवसाढवळ्या अपहरण (Kidnapping) करून त्यांना लुटल्याची (Loot) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जगदीश हे ढोके येथील जिल्हापरिषद शाळेत शिक्षक (School Teacher) आहेत. बुधवारी ते कारने शाळेत जात असताना ढोके गावातील प्रथमेश वाकुर्ले व त्याच्या दोन साथीदारांनी जगदीश यांचे अपहरण करून त्यांना बदलापूर दिशेला नेऊन त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार रूपयांचा माल काढून घेतला. त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. यातील प्रथमेशचा दुसरा साथीदार प्रदीप खापरे हा सराईत चोर असून या अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान कोळसेवाडी पोलिसांसमोर आहे.

कल्याण पश्चिमेतील रिजन्सी टॉवर परिसरात जगदीश पवार कुटूंबासह राहतात. अंबरनाथ तालुक्यातील ढोके येथील जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक आहेत. बुधवारी सकाळी 8.30 वाजता ते आपल्या कारने शाळेत जायला निघाले. कल्याण पूर्वेतील नांदीवली बस स्टॉप जवळ त्यांची कार आली असता ढोके गावातील तोंड ओळख असलेला प्रथमेश याने त्यांच्या कारला हात दाखवून ढोके गावात सोडण्यास सांगितले. यावेळी प्रथमेशसह त्याचा एक साथीदार कारमध्ये बसला. द्वारली गावाच्या पुढे गाडी आली असता मित्राला उतरायचे आहे सांगून त्यांनी गाडी थांबवली. याचवेळी त्याच्या मित्राने चॉपर काढून मला धमकावले. त्यानंतर त्यांनी गाडी नेवाळी येथे आणली तिथे त्यांचा आणखी एक साथीदार कारमध्ये बसला.

प्रथमेश याची बहीण मनीषा हिच्यासोबत जगदीश यांचे बोलणे होत असून याविषयी बदलापूर ला तिच्या घरी जाऊन याची शहानिशा करू अशी धमकी देत त्यांनी बदलापूर दिशेने कार नेली. जगदीश यांनी असे न करण्याची विनवणी केली असता त्यांनी त्यांना व त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर करमध्येच दारू पिऊन त्यांनी जगदीश यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व रोख रक्कम काढून घेतली. त्यांचा मोबाईल घेऊन गुगल पे वरून विश्वकर्मा याच्या फोन पे खात्यावर पैसे ट्रान्सपर केले.

तसेच आणखी पैशाची मागणी केली असता जगदीश यांनी मित्रास फोन करून खात्यावर पैसे मागवून घेतले. ते पैसे देखील या अपहरणकर्त्यांनी गुगल पे ने व एटीएम मधून काढून घेतले. त्यानंतर जगदीश यांना कपडे उतरवण्यास सांगून त्यांचा अश्लील व्हिडीओ बनविला. घडलेला प्रकार कोणाला संगतल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची व गावात देखील तो दाखवून बदनामी करू अशी धमकी देत कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे येऊन ते गाडीतून उतरून गेले असे जगदीश यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री प्रथमेश वाकुर्ले व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश यांच्यासोबत प्रदीप खापरे हा दुसरा साथीदार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रदीप हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com