डोंबिवलीत शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण ! शिवसेना शाखेतर्फे भव्य मिरवणूक

Shivjayanti grand procession
Shivjayanti grand processionsakal media

डोंबिवली : लाठी काठीचे खेळ, भालदार चोपदार, मावळढोक, नाचणारा घोडा यांसारखे शिवकालीन मर्दानी खेळ सादर करीत ढोल ताशांच्या गजरात डोंबिवली शिवसेना (Dombivali shivsena) शहर शाखेच्या वतीने भव्य मिरवणूक (Grand Procession) काढण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (dr shrikant shinde), डोंबिवली शहराध्यक्ष राजेश मोरे, भाऊ चौधरी यांसह अनेक कार्यकर्ते व शिवप्रेमी रॅलीत सहभागी झाले होते. मिरवणूकीसोबतच शहरातील विविध चौकांत, प्रभागात शिवजयंती (Shivjayanti) निमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते यामुळे दिवसभर उत्साहाचे वातावरण शहरात दिसून आले.

Shivjayanti grand procession
मुंबई : तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला मिळाला 200 कोटींचा महसूल

डोंबिवलीत तिथीनुसार शिवसेनेच्यावतीने शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. चौकाचौकात शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक चलचित्र साकारण्यात आले होते. सायंकाळी शिवसेना शहर शाखेच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीचे आकर्षण म्हणजे सादर होणारे शिवकालीन मर्दानी खेळ हे खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळाले. चित्ररथ देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शहर शाखेजवळील शिवाजी पुतळा येथून या रॅलीस सुरुवात झाली. चार रस्ता, टिळक चौक, सर्व्हेश रोड, फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक ते शिवाजी पुतळा अशी ही मिरवणूक होती.

वाहतूक कोंडी

शिवाजी पुतळा येथून रॅली चार रस्ता मार्गे टिळक नगर, टिळक चौक अशी मार्गस्थ झाली. चार रस्ता मार्गावर एकेरी वाहतूक ठेवल्यामुळे भगतसिंग मार्गे सर्व वाहने फिरवली जात होती. यामुळे टिळक रोड, मानपाडा रोड, सावरकर रोड, भगतसिंग रोड या परिसरात वाहतूक कोंंडीची समस्या काही काळ निर्माण झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com