डोंबिवली : मनात आलेला आत्महत्येचा विचार बाळाकडे पाहून नाकारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : मनात आलेला आत्महत्येचा विचार बाळाकडे पाहून नाकारला

डोंबिवली : पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलाचा सौदा केला, मात्र ठरलेली रक्कम पूर्ण न मिळाल्याने आईने बाळ परत मिळावे याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन लाख रुपये देऊन बाळाची खरेदी केलेले सिंग दाम्पत्य शनिवारी पोलीस ठाण्यात बाळासह दाखल झाले आहे. पैसे देऊनही खोटे आरोप करत गुन्हा दाखल झाल्याने सिंग दाम्पत्याच्या मनात आत्महत्येचा विचार मनात आला होता. मात्र बाळाकडे पाहून तो विचार आम्ही झटकल्याचे सिंग यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले.

पैशांसाठी आईनेच आपल्या बाळाची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. ठरलेल्या सौद्यातील रक्कम पूर्ण न मिळाल्याने बाळाचा सांभाळ करण्यास दिलेली महिला आपलं बाळ परत देत नसल्याची तक्रार आई शीतल मोरे हिने मानपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या चौकशीत मात्र आईचा बनाव उघड होऊन कायदेशीर प्रक्रिया न करता बाळ खरेदी विक्रीची घटना पुढे आली.

हेही वाचा: औरंगाबाद : मागे-पुढे पोलिसांचे वाहन अन् मधे शिवशाहीचा थाट!

याप्रकरणी बाळास विकत घेणारे दीपक सिंग, आई मोरे, कल्पना मावशी, लक्ष्मी कोडर, इंदू सूर्यवंशी व अमोल वालेकर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक हा कार्यासाठी गावी गेला असल्याने पोलीस तो बाळ घेऊन यायची वाट पहात होते. शनिवारी ते परतले असून पोलीस ठाण्यात बाळासह हजर झाले आहेत. सर्वांना कल्याण जिल्हा सत्र न्यायलयात हजर केले जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

सर्व पैसे देऊनही आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजताच मानसिक त्रास होऊन सिंग दाम्पत्याच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. मात्र बाळ आमच्या जवळ असल्याने आम्ही तो विचार नाकारल्याने त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.

loading image
go to top