डोंबिवली जलमय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

डोंबिवली - शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह १० तास जोरदार कोसळलेल्या पावसाने डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आठ ते दहा इंच पाणी साठले.

डोंबिवली - शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह १० तास जोरदार कोसळलेल्या पावसाने डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आठ ते दहा इंच पाणी साठले.

परिसर जलमय झाला होता; परंतु दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरले. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर गायब झालेल्या पावसाने शनिवारी रात्री चांगलीच हजेरी लावली. काही ठिकाणी जलमय स्थिती उद्‌भवली. पश्‍चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड; तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकारामनगर या ठिकाणी पाणी साचले असून पश्‍चिमेतील गोपीनाथ चौकात व केळकर रोड, सागर्ली, ठाकुर्ली परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

Web Title: dombivli news rain

टॅग्स