मराठी भाषेसाठी डोंबिवलीत सह्यांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

डोंबिवली -मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत उद्या (ता. १) महाराष्ट्रदिनी सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या मृणाल पाटोळे यांनी दिली.

मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविणे आणि मराठी माध्यमातून शिकण्यासाठी पुढील पिढीला प्रवृत्त करणे, या उद्देशाने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे. हैदराबाद येथे सुचिकांत वनारसे यांनी ‘ज्ञानभाषा मराठी’ हा समूह सुरू केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत या समूहाची संस्था स्थापन झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषेची चळवळ सुरू असली, तरी राज्य सरकारला जागे करण्यासाठी आणि मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून देण्यासाठी डोंबिवलीत महाराष्ट्रदिनी रेल्वेस्थानक परिसरात सकाळी ९ ते ५ या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. सरकारी व्यवहारात मराठीला प्राधान्य द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटोळे यांनी सांगितले. 

Web Title: Dombivli sectarian campaign for Marathi language