निसर्गाचा आनंद घ्या, त्याला जाळू नका - राजू पाटील

MNS Raju Patil
MNS Raju Patilsakal media

डोंबिवली : उंबार्ली टेकडीवरील वनराईला (Conflagration in Forest) शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ग्रामस्थांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग त्वरित विझवली असली तरी यामध्ये झाडांचे काही प्रमाणात (Trees damaged) नुकसान झाले आहे. या टेकडीची पहाणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Mns raju Patil) यांनी रविवारी सकाळी केली. या आगी वारंवार का लागतात याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होतेय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच काही तरुण पार्टी करण्यासाठी येतात त्यांच्यावरही स्थानिकांनी लक्ष ठेवले पाहीजे. त्यांना अटकाव केला पाहीजे निसर्गाचा आनंद (Nature feel) घ्या, त्याला जाळू नका असा सल्ला तरुणाईला देऊ केला आहे.

MNS Raju Patil
भाजपच्या राज्यात पवित्र सोमरस पण महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार असं का ?

डोंबिवली जवळील उंबार्ली, भाल, दावडी हा टेकडी परिसर वनराईने नटलेला असून तो ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जातो. या टेकडीवरील वनराईचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांसह अनेक संस्था आज कार्यरत आहेत. पर्यावरण प्रेमी, वन विभाग यांच्यावतीने या टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धनासाठी नैसर्गिक तळी, पाण्याच्या टाक्या बसवून पाणी पुरवठा देखील टेकडीवर करण्यात आला आहे. सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी या वृक्षांची देखभाल करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून या टेकडीवर वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहे.

MNS Raju Patil
नेरळ: घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड; सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

येथे घनदाट वृक्ष नसल्याने वणवा लागण्याची शक्यता धूसर असून या आगी जाणून बुजून लावल्या जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. तरुण मंडळी येथे पार्टी करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून कचरा, सिगरेटची थोटके टाकण्यात आल्याने अनेकदा आगी लागत असल्याचा संशय नेहमीच व्यक्त होतो, मात्र प्रत्यक्षात अद्याप कारवाई काहीच झालेली नाही. शनिवारी रात्रीही भाल, दावडी गावाजवळील भागात आग लागून टेकडीवरील झाडांचे नुकसान झाले आहे. या भागाची पहाणी रविवारी आमदार पाटील यांनी केली.

यावेळी ते म्हणाले, ग्रामस्थांकडून येथे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी पाठवून आग आटोक्यात आणली. मात्र या आगी वारंवार का लागतात. या ठिकाणी वन विभागाचे दुर्लक्ष होते का? काही तरुण मंडळी येथे पार्टी करण्यासाठी येतात, अशा तरुणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांना अटकाव केला गेला पाहीजे. निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचा हे तरुणाईला समाजयला पाहीजे. टेकडी संवर्धनासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असून येथे बॉटनिकल गार्डनसाठी डीपीआर बनविण्याचे काम सुरु आहे. टेकडीचा काही भाग संवर्धनासाठी दिला आहे. संबंधित संस्था, वनविभाग यांची बैठक घेत टेकडीला संरक्षण भिंत घालणं गरजेचे आहे असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com