डॉक्टरांनो, पगारी नोकरासारखे वागू नका- न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई : 'तुम्ही पगारी कामगार संघटनांसारखे वागू नका. वैद्यकीय शिक्षण घेताना रुग्णांचे हाल करून सुट्टी घेऊ अशी शपथ घेतली होती का,' असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. 

रुग्णालयात रुग्णासोबत थांबण्यास केवळ दोनजणांना परवानगी द्या, जे डॉक्टर रुजू होतील त्यांच्यावर तुर्तास कठोर कारवाई नको. डॉक्टरांनी सर्वप्रथम कामावर रूजू व्हावे. बाकी समस्या नंतर सोडवू या, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

डॉक्‍टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 40 हजार खासगी प्रॅक्‍टिशनर बुधवारपासून संपावर गेल्याचे असोसिएशनने पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावर उच्च न्यायालयाने संपावर जाणाऱ्या डॉक्टरांना खडे बोल सुनावले आहेत. 
 
Web Title: don't act like paid servants, mumbai hc scolds doctors