शाळांनी शिक्षकांकडे ‘त्या’ रजेचे अर्ज मागू नयेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई : मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून 25 जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे बुधवारी केली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राच्या संदर्भानुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील सर्व शाळांना मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुट्टी दिली होती. शिक्षक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी 22 जून रोजी तसे आदेशही काढण्यात आले. म्हणूनच भर पावसातही शिक्षक मोठ्या संख्येने मतदान करू शकले.

मुंबईतील अनेक शिक्षक मुंबईत राहत नसल्याने ते मुंबईत मतदान करू शकले नाहीत. पण कोकण पदवीधर मतदारसंघात त्यांनी ठाणे, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात मतदान केले. तरीदेखील मुंबईत दुसºया दिवशी शाळा प्रशासनाने सीएल (किरकोळ रजा)चा अर्ज मागितल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेत अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिक्षकांना शाळांनी अशा रजेच्या अर्जाची मागणी न करण्याचे पत्र देऊन संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.

Web Title: dont ask for the application letter for that leav