लोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं

लोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं

मुंबई : अनलॉक सुरु झालं असलं तरीही फिरताना, सरकारी नियमांचे पालन करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या पालिकेच्या मोहिमेला पाठींबा देऊन एकत्र आल्यावरही जबाबदारीचे भान ओळखा तरच कोविड लवकर आटोक्यात येईल. तसेच कोरोना झालेल्यांनी कोरोनाचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही काही काळ घरी विश्रांती घ्या. अन्यथा कोविडनंतरही अन्य आजारांना नियंत्रम मिळू शकते असे  टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांनी सांगितले. 

कोविडची लक्षणे असणाऱ्यांमध्ये 28 दिवसांनंतर अँटिबॉडी तयार होतात. मात्र त्या 3 ते 4 महिन्यापर्यंत राहू शकतात. तसेच कोविड झाल्यासही त्याची तीव्रता कमी असते. तसेच कोविड संक्रमित व्यक्तींपासून कोविड पसरण्याचा धोका हा 9 दिवसापर्यंत असतो त्यामुळे आयसीएमआरने 14 दिवस क्वारंटाईनच्या गाईडलाईन्स आहेत.

सध्या रेमडीसीविर हे औषध कोरोनावर उपयुक्त ठरत आहे. मात्र तरीही काही जणांना अजूनही टोसिलिझुमँब द्यावे लागत आहे.  हा आजार ऋतूंच्याही पलीकडे गेला आहे. कोविडमध्ये खोकला सर्दी, जुलाब न होता विसराळूपणा तर कोवीडची ट्रीटमेंट झाल्यावर हृदयविकाराचा झटका येत आहे. तर काहींना मधुमेह होत आहे. कोविडची रुग्णसंख्या त्या पटीत कमी झालेली नसली तरी मृत्यूचे प्रमाण आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण घटले असल्याचे समाधान आहे. त्यामुळे रिस्क असेसमेंट करण्यास आपण सक्षम असल्याचा आनंद असल्याचे डॉ.ओक सांगतात.

कोविडकाळात जबाबदारीने वागा :      

सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी असे समजून समाजात जबाबदारीचे भान राखून वागा. आपण हे भान विसरल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. कोविड लवकर जाईल असे नाही. मात्र पुन्हा लॉकडाऊन करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे बाहेर पडताना सरकारच्या नियमांचे पालन करा.

कोविडचे उपचार झाल्यानंतरही अन्य आजारांचा धोका

कोविड उपाचारानंतर धाप लागणे, कधीही न अनुभवलेला अशक्तपणा, हृदयविकार, पाय दुखणे, विस्मरण, मेंदूकडील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या, थकवा जाणवतो. त्यामुळे कोविडनंतर फिजिओथेरपी करण्यावर भर द्यावा.

( संपादन - सुमित बागुल )


dont be negligent because those who cured from covid are suffering many other serious issues  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com