कला शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मुंबई - कला शिक्षकांना अतिरिक्त ठरवल्यानंतर ते इतर विषयही शिकवू शकणार नाहीत. त्यामुळे अशा शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिक्षण उपचसंचालकांना पत्र पाठवल्याचे सांगितले.

राज्यातील माध्यमिक शाळांमधील चित्रकला शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त ठरवल्यामुळे एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षांना विद्यार्थी मुकतील, अशी भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. ज्या शाळांत पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत आणि कला विषयाचा पूर्णवेळ कार्यभार आहे, तेथील कला शिक्षकांनाही अतिरिक्त ठरवले जात आहे. शिक्षणाधिकारी

कार्यालयांकडून चुकीच्या पद्धतीने हा प्रकार होत आहे. त्यामुळे विषयाचा कार्यभार असताना कला शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, अशी मागणी मोते यांनी केली आहे.
एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कला शिक्षकच मार्गदर्शन करत असतात; मात्र त्यांनाच अतिरिक्त ठरवले गेले, तर विद्यार्थी परीक्षेला बसू शकणार नाहीत, अशी शक्‍यता शिक्षक परिषदेने वर्तवली आहे.

Web Title: Don't consider Art teachers as additional teachers