एक क्षणही वाया न घालवता पळत सुटलो...

hamid ansari
hamid ansari

मुंबईः सकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृह उप अधीक्षक आले आणि म्हणाले तुझी सुटका होत आहे, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. वाक्य कानावर पडताच प्रचंड आनंद झाला आणि एक क्षणही वाया न घालवता अर्धा तास काय तर काही मिनिटातच तयार झालो अन् पळत-पळत जाऊन गाडीत बसलो, असे पाकिस्तानी कारागृहातून सहा वर्षे शिक्षा भोगून भारतात परतेला सॉफ्टवेअर इंजिनिअर हमीद अन्सारीने सांगितले.

हमीद अन्सारी हा फेसबुकवरून पाकिस्तानी युवतीच्या प्रेमात पडला होता. तिला भेठण्यासाठी तो अफगणिस्तानला गेला आणि अफगणिस्तानातून पाकिस्तानमधील तिच्या घरासमोर पोहचला. परंतु, तो पाकिस्तानमध्ये येणार असल्याची माहिती अगोदरच स्थानिकांना होती. त्यांनी पोलिसांना अगोदरच याबाबतची माहिती दिली होती. प्रेयसीच्या घरासमोर पोहचताच तिला भेटण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली. हेरगिरीचा आरोप लावत त्याला अटक करण्यात आली होती. मग रवानगी कारागृहात झाली. कारागृहामध्ये सहा वर्षे घालवावी लागली.

पाकिस्तानमधील कारागृहात सहा वर्षे घालवल्यानंतर वाघा-अटारी सीमेवरून हमीद भारतात दाखल झाला आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर हमीद आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वर्सोवा येथील घरी पोहोचला. शेजाऱ्यांनी हमीदच्या स्वागताची पूर्ण तयारी केली होती. यावेळी बोलताना तो म्हणाला, 'मंगळवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता कारागृह उप अधीक्षक आले आणि मला तुझी सुटका होत असून, तयारी करण्यासाठी फक्त अर्धा तास आहे. मला प्रचंड आनंद झाला. तहान-भूक विसरून गेलो होतो. एकही क्षण वाया घालवायचा नाही असे ठरवून कपडे बदलले, बूट घातले आणि पळत-पळत जाऊन गाडीत बसलो. माझ्या मातृभूमीत आल्यानंतर निश्वास सोडला. आपल्या आई-वडिलांपासून काहीच लपवू नका. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा फक्त आई-वडील तुमच्या बाजूने उभे असतात. कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब अजिबात करु नका.'

फेसबुकवरुन प्रेमात पडू नका...
फेसबुकच्या माध्यमातून प्रेमात पडू नका. माझी जी चुक झाली आहे ती तुम्ही करू नका. मला सहा वर्षे कारागृहात घालवावी लागली. सुटका कधी होईल, याबद्ददल काहीच सांगता येत नव्हते. परंतु, मी आता माझ्या देशात आलो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com