Uddhav Thackeray : गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : गिधाडांना लचका तोडू देऊ नका, असं शिवसेनेच्या गटनेत्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नेस्को सभागृहात आज शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते. (Dont let the vultures break Mumabi Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks over BJP)

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजच सांगतो. एक लक्षात घ्या मृत्यूमध्ये फरक कसा असतो. मी गिधाड हा शब्द का वापरला हे लक्षात घ्या. कारण मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी केवळ विकण्यासाठी स्वेअर फुटाची जमीन असेल पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे.

तुमचं बर आहे रिअल इस्टेट म्हणून विकायला. ही आमची मातृभूमी आहे. येता मी बघत होतो १ मे ला आम्ही शिवजयंतीला या बाजूला शिवाजी महाराज आणि त्याच्या मागे गडकिल्ल्यांची भिंत आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण मुंबादेवीची प्रतिमा आपण लावली आहे. ती आमची आई आहे, या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात आम्ही कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

दुर्देवानं आईला गिळणारी अवलाद देखील आहे. माणसं आहात की जनावरं आहात. ज्या शिवसेनेनं आजवर तुम्हाला मोठं केलं. ज्या शिवसेनेनं तुमचा मान मरातब सर्व पदं दिली. ती देखील तुम्ही ढोकळा खायला सूरतला गेलात. आमच्या वडापावमधला तुम्हाला ठेचा जास्त झाला की आग झाली तुम्हाला, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला केला.

दसरा मेळाव्यात मी काय लक्तरं काढायची आहे ती मी काढणारच आहे. मुंबईला गिळताना तुमचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई हे पहिल्यांदाच बोलतो आहे, हा बाळासाहेबांचा शब्द आहे. ही तीच शिवसेना आहे. त्यामुळं पुण्या-मुंबईवर हक्क सांगायचा प्रयत्न करु नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला.

Web Title: Dont Let The Vultures Break Mumabi Uddhav Thackeray Appeal To Shiv Sainiks Over Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..