कोरोनापाठोपाठ आता या संकटामुळे तलासरी, डहाणूकर हवालदिल

File Photo
File Photo

तलासरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच नागरिक घरात आहेत; मात्र असे असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आता नक्की घरात राहावे की बाहेर, अशा द्विधावस्थेत येथील लोक असल्याचे चित्र आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, कासा, चारोटी आणि बोईसरपर्यंतचा परिसर बुधवारी रात्री पुन्हा एकदा भूकंपाने हादरला. डहाणू तलासरी भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असून भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे हजारो धक्के आतापर्यंत या परिसराला बसले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. 

बुधवारी रात्री ११.१९ वाजता पहिला धक्का बसल्यानंतर एकापाठोपाठ एकदोन भूकंपाचे धक्के पुन्हा या परिसरात बसले. यामध्ये ११.३९ वाजता बसलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता ३.० मॅग्नेट्यूड क्षमतेची नोंदवली गेली. पालघर जिल्ह्यातील बोईसर, सातपाटी, चारोटी, कासा, डहाणू, धुंदलवाडी, दापचरी, तलासरी इत्यादी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांकडून समोर आली आहे.

Double crisis on the Talasari, Dahanukars

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com