डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

चेंबूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत येणारे अनेक आंबेडकरी नागरिक चेंबूर येथील आंबेडकर उद्यानाला आवर्जून भेट देतात. पण पालिकेच्या दुर्लक्षामुळे त्याची दुरवस्था झाल्याची बातमी शुक्रवारी (ता. १३) ‘मुंबई टुडे’मध्ये प्रसिद्ध होताच पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

पालिका एम पश्‍चिमचे प्रभारी सहायक आयुक्त संभाजी घाग यांनी तत्काळ दखल घेऊन मेंटेनन्स, उद्यान, विद्युत, घनकचरा, सुरक्षा रक्षक या विभागातील अधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या कामाकडे जातीने लक्ष घालण्यास सांगितले. उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाण्याने स्वच्छ करण्यात आला. उद्यानाच्या कामाकरिता चार कामगार लावत दोन सुरक्षारक्षक नेमले. तसेच उद्यानाचे सुशोभीकरण करून रोषणाई केली. सीसी टीव्ही, कारंजे सुरू केले. फुलझाडे लावली. हे सुशोभीकरण कायम स्वरूपाचे असावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समन्वय समितीने केली आहे.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar garden