डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयने यासाठी मागितली 15 दिवसांची मुदतवाढ

File Photo
File Photo

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेल्या पिस्तुलाचे अवशेष शोधण्याची मोहीम ठाण्याच्या खाडीत सुरू आहे. सीबीआयने या मोहिमेला पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. 

डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांनी ठाण्यातील खाडीत पिस्तुलाचे सुटे भाग टाकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शस्त्राचे अवशेष शोधण्यासाठी परदेशातून पाणबुड्यांना बोलावण्यात आले असले, तरी अद्याप त्यात यश आलेले नाही. सीबीआयच्या मागणीवरून न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने या मोहिमेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली आहे.

डॉ. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. पानसरे आणि दाभोलकर यांच्या निकटवर्तीयांनी न्यायालयात याचिका केल्या आहेत. 

Dr. Dabholkar murder case: CBI demands 15-day extension

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com