डॉ. ज्योत्स्ना कार्येकर यांचे निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - मराठी प्रायोगिक व व्यावसायिक नाटक, जाहिरात, मालिका आणि चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. ज्योत्स्ना कार्येकर (वय 82) यांचे शनिवारी (31 डिसेंबर) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे अभिनेता यतीन कार्येकर यांच्यासह डॉ. प्रफुल्ल व डॉ. चेतन हे मुलगे आहेत. रविवारी (ता. 1) अंधेरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्या तीन वर्षे अल्झायमरने आजारी होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांना अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एचएमव्ही कंपनीचे वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत्या. वसंतराव कामेरकर यांच्या घरी दिग्गज गायकांच्या मैफली रंगत असत. नाटकांच्या तालमीही होत असत. कलेचा हा वारसा ज्योत्स्ना कार्येकर यांच्यासह सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे व आशा दंडवते या त्यांच्या अभिनेत्री बहिणींनाही लहानपणापासूनच मिळाला. 

"आधेअधुरे', "काचेचा चंद्र', "माणूस नावाचे बेट', "गिधाडे', "गौराई' ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. "कथा', "सत्या', "राख', "जोश' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. "साथ निभाना साथिया', "शांति', "राजा की आएगी बारात' या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. स्टार प्लस वाहिनीवरील "कहानी घर घर की' मालिकेत त्यांनी साकारलेली नानी सगळ्यांच्या लक्षात आहे.

Web Title: DR. Jyotsna karyekar dies