पेडणेकरांनी स्वीकारली कुलकुरुपदाची सूत्रे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी शनिवारी (ता. 28) फोर्ट संकुलात कार्यभार स्वीकारला.

आठ महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार पाहणारे कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. पेडणेकर यांच्याकडे सूत्रे सोपविली. 

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. कविता लघाटे उपस्थित होत्या. तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारीही या वेळी उपस्थित होते.

डॉ. पेडणेकर रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शुक्रवारी निवड जाहीर केली. शनिवारी डॉ. पेडणेकर यांनी पदभार स्वीकारला. 

160 वर्षांपासून विद्यापीठाने ज्ञानदानाचा वारसा जपला आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून, त्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे या वेळी डॉ. पेडणेकर म्हणाले. 

Web Title: Dr Suhas Pednekar takes charge as Mumbai University VC