डॉ. झाकिर नाईकला दिलासा देण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - सध्या परदेशात असलेला वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकिर नाईक याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. "मनी लॉण्डरिंग' आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरविल्याप्रकरणी त्याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधातील त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

झाकिर नाईक हा तपास यंत्रणांना कुठल्याही स्वरूपाचे सहकार्य करत नसल्याचे कारण देत त्याला कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आरोपपत्राला विरोध करतानाच एनआयएने आणि ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती अहवाल स्वरूपात द्यावी, या मागणीसाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्याने याचिकेत केली आहे.

न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती ढेरे-मोहिते यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. 65 पानांच्या या आरोपपत्रासोबत एक हजार पानांचे दस्तऐवज आणि 80 हून अधिक साक्षीदारांचे कबुलीजबाब जोडले आहेत.

Web Title: dr zakir naik high court