मुंबई पोलिस आयुक्तपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले! 

मुंबई पोलिस आयुक्तपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले! 

मुंबई - "मैं भी बॉय फ्रॉम साऊथ मुंबई, बोल के ही शुरुवात करुंगा,' हे हिमांशू रॉय यांनी मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल, या प्रश्‍नावर दिलेले मिश्‍कील उत्तर आणि ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आजही आठवते. त्यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी पात्र अधिकारी म्हणून पाहिले जात होते; मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. नियतीलाच ते मान्य नसावे, असेच म्हणावे लागेल. 

राकेश मारिया, हिमांशू रॉय यांची पोलिस दलात सुपरकॉप म्हणून ओळख होती. हायप्रोफाईल प्रकरणांची उकल केल्यानंतर ते त्यांच्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करायचे. पत्रकार त्याला मस्ती दरबार म्हणायचे. राकेश मारिया यांच्या पावलावर पाऊल ठेवून रॉय यांनी गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्तपद, एटीएस प्रमुख या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मारिया यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळली, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबईच्या वांद्रे येथील मुलगा, जो स्लीपर घालायचा, वांद्रे येथील गल्ल्यांत फुटबॉल खेळायचा, तो मुंबईचा पोलिस आयुक्त झाला आहे, अशी प्रतिक्रियेला सुरुवात केली होती. त्यानंतर पत्रकारांनी हिमांशू रॉय यांच्याशी चर्चा करताना एका पत्रकाराने त्यांना तुम्ही आयुक्त झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्याल, असा प्रश्‍न विचारला. त्यावर "मै भी बॉय फ्रॉम साऊथ मुंबई, बोल के ही शुरुवात करुंगा,' असे मिश्‍कील उत्तर दिले होते. 

रॉय यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. त्यांनी चार्टर्ड अकाउंट होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा देऊन आयपीएस अधिकारी झाले होते. पीळदार आणि बलदंड शरीरयष्टी असणारा आणि सतत हसतमुख अधिकारी आजारपणामुळे एवढा खचेल, असे कधीच वाटले नव्हते. कुलाबा, मंत्रालय, आझाद मैदान, फोर्ट यांसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांचे उपायुक्त, गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त, एटीएस प्रमुख अशी खडतर आव्हाने पेलणाऱ्या रॉय यांना अखेर आजाराने हरवले असेच म्हणावे लागेल. घोड्यावरून पडल्यानंतर कर्करोग झाल्याचे कळले. त्यानंतरही यावर आपण मात करू, असे आत्मविश्‍वासाने सांगणाऱ्या रॉय यांचा धीर खचला. मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत नेहमीच "डार्क हॉर्स' राहिलेला पोलिस अधिकारी आता कधीच या पदापर्यंत पोहचू शकणार नाही, अशी खंत सर्वांनाच राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com