तनिष्कांसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

कोपरखैरणे - ‘सकाळ तनिष्का’ सदस्यांसाठी दुचाकी आणि कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्‍टर आठमध्ये या प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले. यात ३० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोपरखैरणे - ‘सकाळ तनिष्का’ सदस्यांसाठी दुचाकी आणि कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्‍टर आठमध्ये या प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले. यात ३० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आजच्या विज्ञान युगात महिलांनी स्वबळावर अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली आहे. असे असले तरी आजही अनेक महिलांना उत्तम मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्यातील गुणांना वाव मिळत नाही. खास अशा महिलांसाठी तनिष्का हे एक चांगले व्यासपीठ ‘सकाळ’ने दिले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील नेतृत्व गुण वृद्धिंगत व्हावे यासाठी तनिष्काच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातूनच वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. त्याचे उद्‌घाटन ‘सकाळ’ मुंबई युनिटचे व्यवस्थापक दिनेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी दीपक मोटर्सचे जितेंद्र हळदणकर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश भिलारे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. ऐरोलीच्या तनिष्का समन्वयक रूपाली शिंदे, गटप्रमुख माधवी भिलारे, वैशाली आमले, मीना साळुंके यांच्यासह अन्य तनिष्का सदस्य आणि तनिष्का व्यवस्थापक प्रवीण गुंजाळ या वेळी उपस्थित होते.

आजच्या युगात महिलाही करिअरसाठी घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना वाहन चालवण्याची नितांत गरज असते. त्यांची ही गरज लक्षात घेऊन आम्ही दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवत आहोत, असे ‘सकाळ’ मुंबई युनिटचे व्यवस्थापक दिनेश शेट्टी यांनी सांगितले. 

वाहन चालवणे पुरुषांना जेवढे गरजेचे झाले आहे तेवढीच गरज महिलांनाही भासत आहे; परंतु कधी वेळ तर कधी जादा फी यामुळे हे प्रशिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशा वेळी ‘सकाळ तनिष्का’ने या महिलांना मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक महिलांचे वाहन चालविण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- माधवी भिलारे, तनिष्का गटप्रमुख

Web Title: Driving Training for tanishka