रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या जामिनावर निकाल आज

सुनीता महामुणकर
Friday, 11 September 2020

अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेली बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या जामिन अर्जावरील निकाल समजेल. 

मुंबई:  अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेली बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या जामिन अर्जावरील निकाल समजेल. 

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रियाला अटक केली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून भायखळा महिला कारागृहात आहे. तिच्या सोबत शौविक, झैद विलात्रा आणि बसित परिहार यांनी ही जामिनासाठी अर्ज केला आहे. विशेष न्या जी बी गुरव यांच्या पुढे याआवर गुरुवारी सुनावणी झाली. अंमलीपदार्थ बाळगल्याचा आरोप रियावर आहे. मात्र सुशांत सिंह राजपूतसाठी अंमली पदार्थ मागविले होते आणि त्याला दिले, मी घेतले नाही, असा बचाव रियाच्यावतीने करण्यात आला आहे. 

तसंच शौविकनेही सुशांतला अंमलीपदार्थ हवे होते असा दावा सुनावणीमध्ये केला आहे. एनसीबीने जामिनाला विरोध केला आहे. रियाच्या दोन मोबाईलचा उल्लेखही एनसीबीने केला आहे.

कोणत्याही प्रकारचे अंमलीपदार्थ तिच्याकडे सापडले नाही आणि त्याचा वापर करण्याबाबतही तपास यंत्रणेकडे स्पष्टता नाही, त्यामुळे तिला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्य अटक आरोपींनी तिचा उल्लेख केला आहे आणि सुशांतला देण्यासाठी तिनं अंमलीपदार्थ मागविले होते असा आरोप एनसीबीने तिच्यावर ठेवला आहे. याप्रकरणी ती निर्दोष असून तिला नाहक गुंतविण्यात आले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. गुरुवारी वकिल सतीश मानेशिंदे यांनी रियाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.

--------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Drugs related Bail hearing of actor Rhea Chakraborty today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drugs related Bail hearing of actor Rhea Chakraborty today