सांताक्रूझ परिसरात 48 लाखांचे ड्रग्स जप्त; 5 अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drugs seized

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणी शनिवारी पाच आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

Drugs Seized : सांताक्रूझ परिसरात 48 लाखांचे ड्रग्स जप्त; 5 अटकेत

मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ परिसरात अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणी शनिवारी पाच आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 48 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. आशिष राठोड, इद्रिस मुनावर,निरव निषाद, अश्रफ कुरेशी, सिराज शेख अशी अटक आरोपीची नावे आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या एका गुप्त माहितीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या माहितीनुसार, गुन्हे शाखेने सांताक्रुझ येथील रॉड्रिक्स चाळीत छापा टाकला आणि पाचही आरोपीना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी छाप्यादरम्यान 1.62 किलो चरस, 353 ग्रॅम गांजा आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत 48 लाख रुपये एवढी सांगितली जात आहे. आरोपींना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :crimeMumbaiDrug